बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आता तारीख देणार नाही, थेट अटॅक करू; मराठा तरुणांना नक्षलवादी होऊ देऊ नका”

सोलापूर | संपूर्ण महाराष्ट्रभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटल्याचं दिसून येत आहे. मराठा आरक्षणावरून आज सोलापूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर मध्ये संचार बंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. तसेच सोलापूर शहर व ग्रामीण भागाला पोलीस छावणीचे स्वरूप आल्याचे दिसून आले.

सोलापुरातील आजचा मराठा आक्रोश मोर्चा नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात पार पडला. संचारबंदीचे आदेश झुगारून मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील लोक या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी नरेंद्र पाटील यांनी आता आक्रोश मोर्चाची तारीख देणार नाही. आता थेट अटॅक करू, असा इशारा महाराष्ट्र सरकारला दिला आहे.

दरम्यान, नरेंद्र पाटील यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका करताना म्हटले आहे की, ‘मराठा समाजातील तरुणांना आरक्षण द्या, त्यांना नक्षलवादी होऊ देऊ नका’. आता आक्रोश मोर्चाची तारीख जाहीर करण्यात येणार नसल्याचं नरेंद्र पाटील यांनी बोलून दाखवलं आहे.

सोलापूर शहरात येणाऱ्या सर्व मार्गांवर पोलिसांनी नाकाबंदी करून एकाही गाडीला आंदोलनासाठी शहरात येऊ देणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. त्यातच शहरात मात्र दुपारी आंदोलकांनी संचारबंदीचे नियम झुगारून मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभाग नोंदवला. सोलापूरमध्ये आंदोलकांना येऊ दिलं जात नसल्याने नरेंद्र पाटील हे संतप्त झाल्याचं यावेळी दिसून आलं.

थोडक्यात बातम्या – 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More