मुंंबई | माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री माथाडी कामगारांचे प्रश्न सत्तेत येऊनही सोडवत नसल्याने हे पाऊल उचलल्याचं त्यांनी सांगितलं आहे. शिवसेनेला यामुळे मोठा धक्का बसल्याचं समजतंय. नरेंद्र पाटील यांनी लोकसभा निवडणूक सातारा लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर लढवली होती. पण त्यात त्यांना अपयश आलं.
माथाडी कामगारांचे नेते तसेच माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी अखेर शिवसेनेला कायमचा रामराम करण्याचं निश्चित केलं आहे. शिवसेनेच्या काही नेत्यांना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझे चांगले संबंध देखवत नसल्याने नाईलाजास्तव हे पाऊल उचलल्याचं नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
या सर्व प्रकरणी नरेंद्र पाटील यांनी बोलताना सांगितलं की, महाविकास आघाडीचे सरकार येऊन दीड वर्ष उलटून गेली, तरीही माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवण्यात मुख्यमंत्री असमर्थ ठरले. तसेच भेटण्यासाठी वेळ मागितली असता मुख्यमंत्री यांची भेट होत नाही. त्यामुळे शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतल्याचं नरेंद्र पाटील यांनी सांगितलं.
माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या सोडचिठ्ठीने शिवसेनेला मोठा धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेतील काही नेत्यांचीच अशी इच्छा होती. असेही नरेंद्र पाटील यांनी बोलून दाखवल्याने नेमकं शिवसेनेला धक्का बसला की त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण झाली? हे अद्याप अस्पष्टच आहे.
थोडक्यात बातम्या –
45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ‘या’ तारखेपासुन सरसकट लस मिळणार; केंद्राची मोठी घोषणा
हरियाणातील धक्कादायक प्रकार! भर सभेत महिला IAS ऑफिसरची काढली छेड
IPS रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट, राष्ट्रवादीच्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ
तरुणीला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या परप्रांतीय तरुणाला मनसे पदाधिकाऱ्यांकडून चोप, पाहा व्हिडिओ
‘शरद पवारांच्या पाठिंब्याचा आदरच, पण…’; नवनीत राणांचं रूपाली चाकणकरांना जोरदार प्रत्युत्तर
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.