…तोपर्यंत धर्मा पाटील यांचा मृतदेह स्वीकारणार नाही!

…तोपर्यंत धर्मा पाटील यांचा मृतदेह स्वीकारणार नाही!

मुंबई | जोपर्यंत संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला आणि शहीद भूमिपूत्र शेतकऱ्याचा दर्जा मिळत नाही, तोपर्यंत धर्मा पाटील यांचा मृतदेह स्वीकारणार नाही, असं त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी जाहीर केलंय. 

धर्मा पाटील यांना सरकारने संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नव्हता. त्यासाठी त्यांना मंत्रालयाचे उंबरठे झिजवावे लागले. अखेर त्यांनी विषप्राशन केलं. 

जे.जे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते, मात्र काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. आता त्यांच्या मुलानं मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मृतदेह न स्वीकारण्याची भूमिका घेतलीय. 

Google+ Linkedin