बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ब्रिटीशांनीही कधी आंदोलने दडपली नाहीत, ठाकरे सरकार ब्रिटीशांपेक्षाही वाईट”

सोलापूर | मराठा आक्रोश मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजक आणि माजी आमदार नरेंद्र पाटील ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ब्रिटीशांनीही कधी आंदोलने दडपली नाहीत. पण हे सरकार आंदोलन दडपत आहे. हे सरकार ब्रिटीशांपेक्षाही वाईट आहे, अशी टीका नरेंद्र पाटील यांनी केली.

राज्यात काही मूक मोर्चे निघाले. सरकारने त्यांना परवानगी दिली. पण मराठा आक्रोश मोर्चाला विरोध केला जातोय. आमचे मोर्चे अडवले जात आहेत. आमच्या लोकांना जिल्ह्यात येऊ देत नाही. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फोर्स तैनात करण्यात आला आहे. सातारा आणि सांगलीतून पोलीस मागवले आहेत. त्यामुळे मराठ्यांची ताकद किती आहे हे सरकारलाही कळून चुकलं आहे, असं नरेंद्र पाटील म्हणाले.

सोलापूरच्या वेशीवर मराठा कार्यकर्त्यांना आणि महिलांना अडवण्यात आलं आहे. त्यांना तात्काळ सोडून देण्यात यावं. नाही तर आम्ही जागचे हलणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

मराठा आक्रोश मोर्चासाठी आम्ही परवानगी मागितली. पण परवानगी नाकारण्यात आली. आज सांगून मोर्चा काढला तर एवढी यंत्रणा उभी केली. उद्या न सांगता मोर्चा काढला जाईल. मग पाहू पुढे काय होते ते, असंही नरेंद्र पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

एनडीए असो की यूपीए ओबीसींना पाहिजे तसा न्याय मिळाला नाही- महादेव जानकर

चिंताजनक! रत्नागिरीत जून महिन्यात तब्बल ‘इतकी’ मुलं कोरोनाच्या विळख्यात

ह्रदयद्रावक! 12 दिवसाच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू

‘हमारी अफवाह के धुंए वहीं से उठते है, जहाँ…’; राऊतांचं सूचक ट्विट

इन्स्टा रिच लिस्टमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राचं नाव!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More