बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अशोक चव्हाण यांनी स्वत:ला मराठा म्हणून घेऊ नये”

जालना | मराठा आरक्षणावरून काँग्रेस नेते आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी टीका केली आहे. जालन्यात ते माध्यमांशी बोलत होते.

अशोक चव्हाण यांनी स्वत:ला मराठा म्हणून घेवू नये. अशोक चव्हाण यांच्यामुळे मराठा समाजाला खूप त्रास झाला असल्याचं म्हणत नरेंद्र पाटील यांनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी आता राज्यभरात तीव्र आंदोलन करु, असं म्हणत पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. याआधी मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका अशोक चव्हाणांनी मांडली आहे.

दरम्यान, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे ही राज्य सरकारची भूमिका आहे, असं अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सुखदुःखात शेतकर्‍यांच्या पाठीशी ठाम ऊभे राहिले”

“कुठलाही संकल्प नसेल तर त्याला अर्थसंकल्प तरी कसं म्हणायचं?”

“कोणत्या राज्यात कोणाची सत्ता आहे यावरून अर्थसंकल्प तयार होऊ लागला तर कसं व्हायचं?”

निवडणुका असलेल्या राज्यांना जास्त गिफ्ट, महाराष्ट्रासाठी काय?- आदित्य ठाकरे

संकटाचं संधीमध्ये रुपांतर कसं करतात हे दाखवणारा अर्थसंकल्प आहे- देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More