बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ठाकरे सरकारमधील मराठा मंत्री तोंडात गुटखा खाऊन बसलेत का?, नाहीतर मराठा नाहीत जाहीर करा”

सोलापूर | मराठा आंदोलनाचा विषय चांगलाच पेटला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये टीका होत आहे. अशातच ओबीसी आंदोलनावरून ओबीसी समाजाचे नेते एकत्र येत आहेत. यावरून मराठा समाजाचे नेते आणि  अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

ओबीसी समाजाचे नेते हे त्यांचं राजकीय आरक्षण किंवा पदोन्नतीमध्ये आरक्षण अडचणीत आल्यानंतर एकत्र येतात. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील मराठा मंत्री मात्र तोंडात गुटखा खाऊन बसलेत का?, असा खोचक सवाल करत नरेंद्र पाटील यांनी केला आहे. सोलापूरमध्ये मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.

ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना लाजा वाटत नाही का?, नाहीतर किमान आम्ही मराठा नाहीत हे तरी जाहीर करा, असंही नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे. मराठा क्रांती संघर्ष मोर्चा हा आक्रमक असेल, असा इशाराही पाटील यांनी सरकारला केला आहे.

दरम्यान, घरात बसून, काळे झेंडे दाखवून आंदोलन करायचं नाही, हे असं मिळमिळीत आंदोलन मराठ्यांचं नाही. एखाद्या मंत्र्याची गाडी आली तर दगड घालून त्याची काच फोडली पाहिजे, असं नरेंद्र पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

फडणवीसांच्या सरकारमध्ये शिवसेनेला गुलामासारखी वागणूक मिळाली- संजय राऊत

महाराष्ट्रात अनलॉकला सुरुवात, पण ‘या’ 6 जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती चिंताजनक

“‘या’ राज्यातील भाजपचं सरकार जाणार हे नक्की”

‘या’ शहरातील कोरोना आला आटोक्यात; सक्रिय रुग्णसंख्येत लक्षणीय घट

“उद्धव ठाकरे दिल्लीतून हात हलवत आले, मुख्यमंत्र्यांच्या मनात पाप”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More