सत्तेबाहेर राहिल्यानं शरद पवारांचा तोल सुटत चाललाय- भाजप आमदार

मुंबई | पवार साहेबांचा तोल सुटत चाललाय, अशा शब्दात कल्याण पश्चिमचे भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. त्यांनी यासंदर्भात फेसबुकवर पोस्ट टाकलीय. 

शरद पवार यांनी औरंगाबादच्या हल्लाबोल यात्रेच्या समारोपावेळी अप्रत्यक्षपणे तिहेरी तलाकचं समर्थ केलं. त्यावरुन तिहेरी तलाकमुळे उध्वस्त होणारे मुस्लीम भगिनींचे संसार पवार साहेबांना दिसत नसावेत, असं नरेंद्र पवार यांनी म्हटलंय. 

विकासाचं राजकरण करताना आम्हाला समाजाच्या यातना बघायला शिकवलं. मात्र सत्तेच्या बाहेर राहिल्याने आदरणीय पवार साहेबांचा तोल सुटत चाललाय एवढं खरं, असं नरेंद्र पवार यांनी म्हटलंय.