नवी दिल्ली | देशात सध्या उलटी गंगा वाहत आहे, शेतकरी संघटनांना दोन महिने विचारण्यात आलं की कृषी कायद्यात काय कमतरता आहे?, मात्र शेतकरी नेत्यांना हे सांगता आलं नसल्याचं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी म्हटलं आहे. राज्यसभेत ते बोलत होते.
शेतकरी संघटना केवळ कायदा रद्द करण्याच्या मागणीवर अडून बसलेल आहेत. आम्ही कर माफ केला तर आता राज्य सरकार कर आकारत आहे. जे कर आकारत आहेत त्यांच्या विरोधात आंदोलन व्हायला हवं, असं नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितलं.
संपूर्ण एका राज्यात लोकं गैरसमजाचे बळी ठरले आहेत. हा एकाच राज्याचा मुद्दा आहे. आम्ही वारंवार सांगितलं आहे की एपीएमसी संपुष्टात येणार नाही. मात्र शेतकऱ्यांना भरकटवल्या जात आहे, असा आरोपही तोमर यांनी केला आहे.
दरम्यान, संपूर्ण जगाला माहित आहे पाण्यानेच शेती होते, रक्ताने शेती केवळ काँग्रेसच करू शकत. भाजप रक्ताने शेती करू शकत नाही, असं म्हणत तोमर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
थोडक्यात बातम्या-
‘…हे पहिले केंद्राला सांगा’; अजित पवारांनी फडणवीसांना फटकारलं
‘तो माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता पण आता…’; या मराठी दिग्दर्शकाने सचिनला सुनावलं
“शेतकऱ्यांप्रमाणे आक्रमक झाल्यावरच मराठा समाजाचे ऐकणार का?”
“आंदोलक शेतकरी देशद्रोही मग अर्णब गोस्वामी, आणि कंगणा राणावत देशप्रेमी आहेत का?”
“भाजपच्या नेत्यांना जनाची नाही मनाची तरी लाज वाटली पाहिजे”