ठाकरे गटात पुन्हा राजकीय भूकंप?, शिंदे गटाच्या दाव्याने खळबळ

Naresh Mhaske | लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर देशासह राज्यातही घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे एकूण 9 खासदार निवडून आले आहेत. मात्र, यातील दोन खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. यामुळे ठाकरे गटात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिंदे गटाचे ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी खळबळजनक दावा केला आहे. काल ठाकरे गटाकडून शिंदे गटातील काही नेते परतीच्या वाटेवर असल्याचं म्हटलं जात होतं. तर, आज शिंदे गटाकडून मोठा दावा करण्यात आलाय.

उद्धव ठाकरे गटात पुन्हा भूकंप होणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात एनडीएचं सरकार आलं आहे. आमच्या सरकारला पूर्ण बहुमत आहे. हे सरकार पाच वर्ष व्यवस्थित कारभार करेल, असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्या गटाचे दोन खासदार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार आहेत, असा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे.

नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांच्या या दाव्यानंतर हे दोन खासदार नेमके कोण?, याबाबत आता वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. त्यामुळे ठाकरे गटात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार की काय? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

शिंदे गटाकडून खळबळजनक दावा

मुल्ला-मौलवींना पैसे देऊन मतं मिळवण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका आम्हाला पटलेली नाही, असे या खासदारांनी आम्हाला सांगितलं असल्याचं नरेश म्हस्के यांनी म्हटलंय. तसंच पक्षांतर केल्यास अपात्रतेची कारवाई होऊ शकते. पक्षांतरबंदी कायद्यातंर्गत कारवाईचा धोका टाळण्यासाठी या दोन खासदारांनी प्लॅनही आखला असल्याचा दावा म्हस्के यांनी केलाय.

या दाव्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मात्र हा दावा फेटाळला आहे. नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी असला थिल्लरपणा करु नये, अशी टीका अंधारे यांनी केली आहे.

News Title –  Naresh Mhaske big claim on thackeray group

महत्त्वाच्या बातम्या-

भारत-पाकिस्तान सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या A टू Z माहिती

नगरमध्ये मोठा राडा; निलेश लंकेंचे समर्थक राहुल झावरेकडून गर्भवती महिलेवर हल्ला; भाजपचा गंभीर आरोप

मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटलांनी घेतला मोठा निर्णय!

एचडीएफसी बँकेने ग्राहकांना दिला मोठा झटका; ऑनलाईन सेवा बंद राहणार

नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा असणार खास; शपथविधी कधी व किती वाजता होणार?