बाॅलीवुडच्या ‘शम्मी आंटी’चे निधन

मुंबई | बाॅलीवुडची ‘शम्मी आंटी’ अर्थात जेष्ठ अभिनेत्री नर्गिस राबडी यांच निधन झालंय. वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘शम्मी आंटी’च्या निधनामुळे बाॅलीवुडला आणखी एक धक्का बसला आहे.

अभिनेत्री नर्गिस राबडी 64 वर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत होत्या. दोनशेपेक्षा अधिक भूमिका त्यांनी साकारल्या. ‘शम्मी आंटी’ने त्यांच्या विनोदी भूमिकांमुळे सगळ्यांची मने जिंकली आणि प्रेक्षकांना मनमुराद हसवलं.

शम्मी यांचे इल्जाम (1954), पहली झलक (1955), बंदिश (1955), आझाद (1955), हलकू (1956), सन ऑफ सिंदबाद (1955), राज तिलक (1958), कंगन (1959), भाई-बहन (1959), दिल अपना और प्रित पराई (1960) यासारखे चित्रपट गाजले.