बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शेतात नांगर धरणारा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आज उपाध्यक्ष पदावर बसतोय याचा आनंद”

मुंबई |  राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार यांचे विश्वासू तसंच निकटवर्तीय आमदार नरहरी झिरवळ यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. भाजपच्या अशोक उईके यांनी आपला अर्ज माघारी घेतल्यामुळे नरहरी झिरवळ यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. (Narhari Zirwal Elected Assembly Deputy Speaker)

नरहरी झिरवाळ यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अजित पवार यांनी ट्वीट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. झिरवळ यांचं काम आम्ही समोरून पाहिलं आहे. शेतात नांगर धरणारा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आज उपाध्यक्ष पदावर बसतोय याचा आनंद आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत. (Narhari Zirwal Elected Assembly Deputy Speaker)

राज्यतील जनतेचे प्रश्न सभागृहात आक्रमकपणे मांडले गेले पाहिजेत. ते सोडवण्याची धमक झिरवाळ यांच्यामध्ये आहे, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

झिरवाळ यांना विषयाची उत्तम जाण असते. आपला मुद्दा ते अतिशय प्रभावीपणे सभागृहात मांडतात. आदिवासी समाजाचे सुख व दुःख दोन्ही गोष्टी त्यांना माहिती आहेत. निश्चितपणे अशा विचारांचा माणूस उपाध्यक्षपदी बसेल तेव्हा समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळेल, अशा भावना राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.

 

ट्रेंडिंग बातम्या-

“केंद्रात गो-गो म्हणून बघा कधी तुमचा खो-खो करतील तुम्हाला पण नाही समजणार”

“मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा कणा शाबूत असेल तर त्यांनी नितीन राऊतांच्या विरोधात कारवाई करून दाखवावी”

महत्वाच्या बातम्या-

विदर्भात कोरोनाचा शिरकाव… यवतमाळमध्ये दोघांना कोरोनाची लागण

कोकणचा हापूसही सापडला कोरोनाच्या कचाट्यात; शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या

पुणेकरांना दिलासा; 10 कोरोनाग्रस्तांची प्रकृती स्थिर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More