‘… आव्हाड तेव्हा तुमची माणूसकी कुठे गेली होती?’; चित्रा वाघ यांनी सुनावलं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवती सेनेच्या कार्यकर्तीला मारहाण करण्यात आल्याच्या प्रकरणाने ठाणे चर्चेत आलं आहे. युवती सेनेच्या रोशनी शिंदे यांना शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली.

या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी उडी घेत एक ट्विट केलं होतं. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आव्हाडांना प्रत्युत्तर देत त्यांच्यावर टीका केलीये.

आव्हाडांनी रोशनी शिंदे यांच्या आई होण्याबाबतची भावनिक पोस्ट टाकली. जितुद्दीन ठाकरे गटाचा ठाण्यातील नरेश मनेरा आणि त्याच्या गुंडांनी 9 फेब्रुवारीला प्रियंका चव्हाण यांना मारहाण केली, कपडे फाडले, त्यांचा विनयभंग केला त्यावेळेला त्यांचा सहा वर्षांचा बाळ तिथेच एकटा टाहो फोडत होता तेव्हा एका आईचा आक्रोश तुम्हाला दिसला नाही क?, असा सवाल चित्रा वाघ यांनी आव्हाडांना केलाय.

स्पीकर चा आवाज कमी करा सांगणारी एक महिला पत्रकार आपल्या बाळाला घेऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी दिघे साहेब आणि बाळासाहेबांचे फोटो लावलेत म्हणून विश्वासाने गेली तर तिचा विनयभंग करून कपडे फाडून मारहाण करणारे तिच्या बाळापासून तिची ताटातून करणारे हेच उद्धव ठाकरे यांचे होते उद्धव गटाच्या लोकांनी एका लेकुरवाळ्या आईला मारहाण केली तिचे कपडे फाडले विनयभंग केला तेव्हा त्याचा समर्थन करणारे जितेंद्र आव्हाड तेव्हा तुमची माणुसकी तुमची संवेदनशीलता कुठे गेली होती, असं चित्रा वाघ म्हणाल्यात.

महत्त्वाच्या बातम्या-