हाफिजचं अभिनंदन केलंत का, भाजप नेत्याचा राहुल गांधींना सवाल

नवी दिल्ली | सुटकेबद्दल हाफिज सईदचं अभिनंदन केलंत का?, असा सवाल भाजपनं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना विचारलाय. 

एकदा तरी देशाच्या बाजुनं उभं राहा. सवयीप्रमाणे दहशतवाद्यांच्या बाजुनं उभं राहू नका. तुम्ही लष्कर-ए तोयबाचे समर्थक आहात याची कल्पना आहे. विकिलिक्स आणि इशरत जहाँ प्रकरणात ते दिसून आलं, अशी टीका भाजपचे प्रवक्ते नरसिम्हा राव यांनी केलीय.

26\11चा मास्टर माईंड हाफिज सईदची गेल्या आठवड्यात सुटका झाली. त्यामुळे मोदी आणि ट्रम्प यांच्या गळाभेटीवरून राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केलं होतं. त्यावर भाजपनं उत्तर दिलंय.