मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

शेतकरी आंदोलनावर मौन बाळगणाऱ्या बॉलिवूडकरांना नसीरूद्दीन शाहांनी झापलं, म्हणाले…

मुंबई | केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे.

शेतकरी आंदोलनाला हॉलिवूडचे कलाकार पाठिंबा देताना दिसत आहेत. मात्र शेतकरी आंदोलनावर बॉलिवूडमधील कलाकार गप्प आहेत. यावरून दिग्गज अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना या कलाकारांना झापलं आहे.

शांत राहणं अन्याय करणाऱ्यांना समर्थन देण्याइतकाच मोठा गुन्हा आहे, असं म्हणत नसीरूद्दीन शाह यांनी बॉलिवूडकरांवर निशाणा साधलाय.

आपल्या फिल्म इंडस्ट्रीतले अनेक मोठमोठे धुरंदर लोकं शांत बसलेत. कारण, त्यांना खूप काहीतरी गमावण्याची भीती वाटते. पण तुम्ही इतकं कमवून ठेवलंय की तुमच्या सात पिढ्या घरी बसून खाऊ शकतील, तर किती गमवाल?, असा सवाल नसीरूद्दीन शाह यांनी शेतकरी आंदोलनावर मौन बाळगलेल्या बॉलिवूडमधील कलाकारांना विचारला आहे.

थोडक्यात बातम्या-

नवरदेवाच्या वागण्यानं स्टेजवर एकच गोंधळ; नवरीही झाली आऊट ऑफ कंट्रोल, पाहा व्हिडीओ

“भरणे मामा मंत्री झाले, मी मंत्री झालो… आम्ही कधी जॅकेट घातलं का?”, या नेत्याला अजितदादांचा टोला

पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; पाहा काय आहे प्रकरण…

अमित शहांच्या पायगुणाने राज्य सरकार जावं- नारायण राणे

कृषी कायदे शेतकरी आणि मजूरांसाठीच नाहीतर देशातील जनतेसाठीही घातक- राहुल गांधी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या