Agniveer Die l भारतीय सैन्यदलात एक दुःखद घटना घडली आहे. नाशिक येथील देवळाली कॅम्पमध्ये भारतीय सैन्यातील दोन अग्नीवीरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे.
दोन अग्निवीरांचा प्रशिक्षणा दरम्यान मृत्यू :
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, देशात अग्नीवीर योजना सुरु झाल्यापासून अग्नीवीर योजनेतील सैनिकांना प्रशिक्षण नाशिक जिल्ह्यातील देवळाली या भागात दिले जात आहे. या गुरुवारी (10 ऑक्टो) दोन अग्नीवर जवानांना तोफेचा गोळा लोड करण्याचे प्रशिक्षण दिले जात होते. मात्र त्यावेळी गोळा लोड करताना अचानक स्फोट झाला.
मात्र या या स्फोटामध्ये गोहिल सिंग आणि सैफत शित हे दोन्ही अग्नीवर गंभीर जखमी झाले. मात्र त्यावेळी त्यांना तातडीने देवळाली येथील सैनिकी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. मात्र आता पोलीस आणि लष्कराकडून या संपूर्ण घटनेची चौकशी करणार आहेत.
Agniveer Die l एका अग्निविरावर उपचार सुरु :
या घटनेवेळी आयएफजी फील्ड गणचा तुकडा हा शरीरात घुसल्याने त्या दोन्ही जवानांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात नाशिकच्या देवळाली पोलीस ठाण्यात या मृत्यूची नोंद देखील करण्यात आली आहे.
याशिवाय या धक्कादायक घटनेत एक अग्निवीर जखमी झाला आहे. मात्र त्याच्यावर देवळाली येथील सैनिकी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
News Title – Nashik Agniveer Die
महत्त्वाच्या बातम्या-
पुण्यातील ‘या’ भागात भरधाव ऑडीने दुचाकीस्वाराला चिरडलं…
गुड न्यूज! दसऱ्या आधीच सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर!
यंदा राज्यात होणार तब्बल 6 दसरा मेळावे; कुणाचा कुठे आणि कधी होणार मेळावा?
900 एकरचं मैदान, 500 क्विंटल बुंदी..; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जोरदार तयारी
‘या’ जिल्ह्यांत आज वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसणार!