Nashik-Bengluru Flights | नाशिककरांची गेल्या अनेक दिवसांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. नाशिक-बेंगळुरू विमानसेवेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. येणाऱ्या 10 सप्टेंबरपासून ही सुविधा सुरू केली जाणार आहे. ओझर विमानतळावरून बेंगळुरूसाठी दररोज थेट विमानसेवा सुरू होत असल्याने नाशिककर आनंदी झाले आहेत.
यासाठी आतापासूनच बुकिंगही सुरू झाली आहे. या सेवेमुळे नाशिकच्या उद्योग आणि पर्यटनाला अधिक चालना मिळेल. ओझर विमानतळावरून सध्या ‘इंडिगो’ या एकमेव कंपनीची सेवा सुरू आहे.
नाशिक-बेंगळूर विमानसेवा सुरू होणार
येथून नवी दिल्ली, अहमदाबाद, नागपूर, हैदराबाद, गोवा व इंदूर या सहा शहरांसाठी सेवा दिली जात आहे. तर, इंदूर व अहमदाबादच्या सेवेत कपात करण्यात आली होती. यामुळे लोकांनी नाराजी व्यक्त केली होती.
त्यानंतर 1 मेरोजी दिल्लीसाठी थेट विमानसेवा (Nashik-Bengluru Flights)सुरू करण्यात आली होती. यानंतर बेंगळुरू सेवेची मागणी करण्यात आली होती. आता ही मागणी देखील पूर्ण झाली आहे. निमा, आयमा, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, तान आदी संघटनांकडून या सेवेसाठी पाठपुरावा सुरू होता.
नाशिक-बेंगळूर विमानसेवेची वेळ काय असणार?
अखेर ‘इंडिगो’ने याला (Nashik-Bengluru Flights) प्रतिसाद देत या सेवेला परवानगी दिली. दरम्यान, बेंगळुरू येथून दररोज दुपारी 2.30 वाजता 180 आसनी विमान उड्डाण घेऊन ते सायंकाळी 4.20 वाजता नाशिकला पोहोचेल. तर, हेच विमान सायंकाळी 4.50 वाजता नाशिकहून भरारी घेऊन 6.35 वाजता बेंगळुरूला पोहोचेल.
नाशिककरांना या सेवेसाठी जवळपास साडेचार हजारपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील.आयटी क्षेत्र व पर्यटनाच्या दृष्टीने ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. बेंगळुरूला अनेक कंपन्यांची मुख्यालये असल्याने भविष्यात याचा मोठा लाभ होण्यार असल्याचं म्हटलं जातंय.
News Title – Nashik-Bengluru Flights
महत्त्वाच्या बातम्या-
सावधान! ‘या’ जिल्ह्यांत आज मुसळधार पाऊस बरसणार, हवामान विभागाचा इशारा
ओबीसी आरक्षणावरून राजकारण तापलं, प्रकाश शेंडगेंचा राज्य सरकारला गंभीर इशारा
मोठी बातमी! पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण?; जाणून घ्या आजच्या लेटेस्ट किंमती
आज ‘या’ राशींवर लक्ष्मी प्रसन्न होईल, मोठा धनलाभ होणार
राज्यात येत्या 48 तासात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी