नाशिक | कोरोनाने सर्व जगभरात हैदोस घातला आहे. सर्व देशात लॉकडाऊनच्या सूचना केल्या आहेत. मात्र तरीही काहीजण नियमांचं उल्लंघन कताना दिसत आहेत. नाशिकमध्ये देखील असे प्रकार पाहायला मिळाले. यानंतर नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी बाहेर पडणाऱ्यांना चाप लावण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.
जमावबंदी आणि संचारबंदीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांच्या गाड्या तीन महिन्यांसाठी जप्त केल्या जाणार आहेत. यासंबंधीचे आदेश सर्व अधिकाऱ्यांना दिला आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य विभागाने नागरिकांना ‘सोशल डिस्टंन्सिंग’ ठेवण्यास सांगितलं आहे. मात्र काही नागरिक याकडे दुर्लक्ष करुन सर्रासपणे बाहेर फिरताना दिसत आहेत. त्यांच्यावर नियंत्रणासाठी नांगरे पाटील यांनी थेट गाडी जप्तीचा जालीम उपाय शोधला आहे. यामुळे एकदा बाहेर फिरायला आलेल्या अतिशहाण्याची गाडी जप्त होणार आहे.
नागरिकांच्या जेवणाची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील 100 हॉटेल्सला केवळ पार्सल सेवा सुरु करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कुटुंबासोबत नसलेल्या नागरिकांना संबंधित हॉटेल्सला ऑर्डर करुन आपलं जेवण मागवता येणार आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
‘या’ त्रिसूत्रीनुसार कोरोनावर प्रतिबंध करण्यात येत आहे- आरोग्यमंत्री
महत्वाच्या बातम्या-
भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश; पाहा सूक्ष्मदर्शकाखाली कोरोना कसा दिसतो
लोक अनधिकृत मार्गाचा वापर करून प्रवास करतायेत हे सगळं बघून मला धक्काच बसला- उद्धव ठाकरे
शिकला तितकाच हुकलेला! क्वारंटाईन असतानाही IAS केरळवरुन कानपूरला पळाला
Comments are closed.