Crime l देशात मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बदलापूर आणि कोलकाता येथे घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. या दोन्ही घटनांमुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महिलांनीच स्वसंरक्षणाची जबाबदारी घेण्याची वेळ आल्याचे दिसून येत आहे. असाच काहीसा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. नाशिकमध्ये माय-लेकीने टवाळखोरांना चांगलाच धडा शिकवला आहे.
नाशिकमध्ये घडला धक्कादायक प्रकार :
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, नाशिकमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, माय-लेकीने टवाळखोरांना चांगलाच धडा शिकवला आहे. त्यामुळे या माय-लेकींच सर्वत्र कौतुक होत आहे. मायलेकींनी छेड काढणाऱ्या चार टवाळखोर तरुणांना चोप देत त्यांची चांगलीच मस्ती चांगलीच जिरवली आहे.
नाशिकमधील शिवशक्ती चौकाजवळ असलेल्या डॉ. हेडगेवार चौकात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी चार टवाळखोरांना जेरबंद केलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या चार तरुणांमध्ये एक अल्पवयीन मुलगा आहे. ही संपूर्ण घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे.
Crime l आईच्या मदतीला मुलगी आली धावून :
नाशिकच्या पवननगर भागातील एक महिला हेडगेवार चौकातील मनपा रुग्णालयात येत होती. त्या वेळी रस्त्यालगत बाकावर बसलेल्या टवाळखोरांनी या महिलेची छेड काढली. सुरवातीला त्या महिलेने दुर्लक्ष केले. मात्र, पुन्हा हा प्रकार घडल्याने तिला राग अनावर झाला नाही. तिने मागे फिरून त्या टोळक्याला विचारणा केली. त्यावर त्या तरुणांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
ज्यावेळी टवाळखोर मुलं त्या महिलेची छेड काढत होती. त्याचवेळी महिलेची मुलगी व तिची मैत्रीण पाठीमागून दुचाकीवर आल्या. टवाळखोर हे आईची छेड काढत असल्याचे मुलीने पहिले. त्यावेळी त्या मुलीने थेट टवाळखोराच्या कानशिलात लगावली. तसेच रस्त्याच्या बाजूला जात असलेल्या भंगारच्या गाडीवरून खुर्ची उचलून महिलेने टवाळखोराला चांगलेच चोपून काढल. या महिलांचा रुद्रावतार पाहून टवाळखोरांनी तेथून पळ काढला. मात्र आता या घटनेने या महिलांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
News Title – Nashik Crime News
महत्त्वाच्या बातम्या-
“राष्ट्रवादीसोबत असल्याने उलट्या होतात, मला अॅलर्जी.. “; शिंदे गटाच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
शिवरायांचा पुतळा कोसळण्यामागे ठाकरे गटाच्या नेत्याचा हात?, निलेश राणेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात धडकणार मोठं संकट, पुढील 24 तास धोक्याचे?; IMD चा स्पष्ट इशारा
गुड न्यूज! पेट्रोल ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त?, जाणून घ्या लेटेस्ट दर
आज लक्ष्मीच्या कृपेने ‘या’ राशी होणार धनवान, सर्व अडचणीही दूर होणार!