Nashik Crime | पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसरात तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणानंतर आता नाशिकमध्येही अत्याचाराची अमानुष घटना उघड झाली आहे. गावातील सरपंचाने दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात मुलींच्या आजीनेही सहभाग घेतल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Nashik Crime)
नाशिकमध्ये घडला धक्कादायक प्रकार
नाशिक जिल्ह्यातील या धक्कादायक प्रकरणात आरोपी सरपंच साईनाथ कोल्हे (Sainath Kolhe) याने गावातील दोन अल्पवयीन मुलींवर सातत्याने अत्याचार केला. तो मुलींना अहिल्यानगर (Ahilyanagar), शिर्डी (Shirdi), त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) आणि इतर ठिकाणी घेऊन जात त्यांच्यावर बलात्कार करीत होता. हा प्रकार अनेक दिवस सुरू होता.
या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे मुलींच्या आजीनेच आरोपीला साथ दिली. संगिता अहिरे (Sangita Ahire) नावाच्या आजीने स्वतःच मुलींना आरोपीच्या ताब्यात दिले. पीडित मुलींनी विरोध केला असता, आजीनेच त्यांना मारहाण केली, शिवीगाळ केली आणि घरात डांबून ठेवले. या अमानुष वागणुकीला कंटाळून मुलींनी अखेर पोलिसांकडे धाव घेतली.
पोलिसांची तत्काळ कारवाई
पीडित मुलींनी चांदवड (Chandwad) पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यांनी आपल्या सोबत झालेल्या अत्याचाराची हकीकत पोलिसांना सांगितली. हे ऐकून पोलीसही हादरले. त्यांनी तातडीने कारवाई करत आरोपी सरपंच साईनाथ कोल्हे, संजय पवार (Sanjay Pawar) आणि संगिता अहिरे यांच्याविरोधात अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Nashik Crime)
या संपूर्ण घटनेने नाशिक जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून लवकरच आरोपींना कठोर शिक्षेसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
Title : Nashik Crime Sarpanch Accused of Assault