#Video | नाशिकमध्ये पावसाचं धुमशान, गोदावरी नदीला पूर

नाशिक | गेल्या काही दिवसांपासून गायब असलेल्या पावसानं राज्यात जोरदार हजेरी लावलीय. नाशिकमध्ये झालेल्या जोरदार पावसानं गोदावरीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून नदीला पूर आलाय. 

रामकुंड परिसराला पाण्याने वेढा दिला आहे, त्यामुळे या भागातील लोकांचं जीवनमान विस्कळीत झालंय. नाल्यांमधील सगळं पाणी आणि घाण नदीला जाऊन मिळत असल्याचं चित्र आहे.

दरम्यान, नाशिकसोबत त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरीतही रात्रीपासून पावसाचा जोर पहायला मिळतोय. त्यामुळे या भागातील जीवनमानावरही त्याचा परिणाम झालाय.

पाहा व्हिडिओ-

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या