Nashik Heavy Rainfall | शेतात पाऊल ठेवताच बळीराजा ढसाढसा रडला, समोर बघितलं तर दिसलं…

नाशिक | महाराष्ट्रात (Maharashtra Heavy Rainfall) गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे राज्यातील काही भागातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे यंदा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे (Rain) शेतातील पिकांना फटका बसला आहे.

यंदा मान्सूनमध्ये (Monsoon) पाहिजे तसा पाऊस पडला नाही, त्यामुळे बहुतांश भागात दुष्काळग्रस्त स्थिती पाहायला मिळाली. मात्र आता पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. नाशिक (Nashik Heavy Rainfall) येथे झालेल्या गारपीटीसह अवकाळी पावसामुळे बळीराजाला फटका बसला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

नाशिक येथे सुरु असलेल्या पावसामुळे अनेक भागातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नूकसान झालं आहे. पावसाची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांना आज अश्रू अनावर झाले आहेत. या मागचं कारण, म्हणजे गारपिटीमुळे नाशिकच्या चांदवड तालुक्यातील बहादुरी गावातील द्राक्षबागा संपूर्ण नष्ट झाल्याच्या पाहायला मिळत आहेत.

बागेतील द्राक्षांचे घड आणि पाने जमिनीवर तुटून पडली आहेत. द्राक्षबागांची घडावर पकड सुद्धा राहिली नाही. द्राक्षं तयार होणार नाहीत अन् व्यापारी द्राक्ष खरेदी करण्यासाठी इकडे येणार पण नाहीत, त्यामुळे लाखो रुपये खर्च करून उभ्या केलेल्या द्राक्षबागेचे आता करायचे काय? असा सवाल शेतकऱ्यांना पडला आहे.

आज पदरचे लाख लाख रुपये खर्च करुन द्राक्षबाग उभी केली होती. याच द्राक्ष बागेच्या येणाऱ्या उत्पन्नावर सुखी संसाराची स्वप्नं रंगवली जातात अन् क्षणार्धात निसर्ग सारं काही हिरावून नेतो, असेच काहीसे राज्यात पाहायला मिळत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी पडलं आहे.

राज्याच्या कोणत्या भागात पिकांचं नुकसान?

नाशिकसह, अमरावती, अकोला या जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अकोल्यामध्ये अवकाळी पावसामुळे तूर, हरभरा, गहू, कपाशी आणि भाजीपाला इत्यादी पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

अकोला जिल्ह्यातल्या मुर्तीजापूर, तेल्हारा, बार्शीटाकळी, पातुर या भागात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्याच्या हाता-तोंडाशी आलेला घास मात्र या अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडल्याचे चित्र राज्यात आहे. दरम्यान, अवकाळी पावसानं बळीराजाला आर्थिक संकटात पाडलं आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे. मात्र सरकार यावर काय भूमिका घेणार? बळीराजांच्या नुकसानीवर सरकार मदत करणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

News Title : Nashik Heavy Rainfall | Due to the heavy rainfall, farmer losses his all crops

थोडक्यात बातम्या-

LIC Pension Scheme | …तर निवृत्तीनंतर दर महिन्याला 28,000 पेन्शन मिळेल, LIC ची भन्नाट योजना

Nita Ambani | नीता अंबानींकडे आहे जगातील सर्वात महागडा फोन; किंमत वाचून थक्क व्हाल

Maharashtra Rain Alert | येत्या 48 तासात ‘या’ भागात वादळीवाऱ्यासह पावसाचा इशारा

Arnold Dix | ‘नायक हे असामान्य असतात’; 41 कामागारांसाठी अरनॉल्ड डिक्स ठरले देवदूत

ब्राझिलियन फळाची लागवड, महाराष्ट्रातील शेतकऱ्याने कमावले 4 लाख रुपये