बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ मागण्यांसाठी नगरसेवकांनी काढल्या तीन रात्री सभागृहातच

नाशिक | नाशिकच्या सभागृह नेत्यांच आंदोलन अद्याप सुरु आहे. 40 तास उलटून गेल्यानंतरही आंदोलन थांबवण्यात आलं नाही. मंगळवारपासून नाशिकमधील सभागृहात हे आंदोलन सुरु आहे.

शहरातील बेकायदा धार्मिक स्थळं हटवण्याचा निर्णय कायमचा रद्द करावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी हे आंदोलन सुरु केलं आहे. त्यांच्या आंदोलनाला विरोधकांनीही पाठिंबा दिला आहे.

सिडकोच्या घरांना नियमाप्रमाणे परवानग्या मिळत नाहीत, लहान मुलांना दिला जाणारा पोषण आहार महिला बचत गटांना दिला जावा अशा त्यांच्या मागण्या आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गजानन शेलार हेदेखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत. ते आपल्या मागण्यांसाठी रात्रभर सभागृहातच झोपले होते.

महत्वाच्या बातम्या

-मुलाच्या गुंडगिरीवर प्रश्न विचारल्यावर भाजप नेते संतापले

-“आणीबाणी लादून इंदिरा गांधींनी विरोधकांना एकजूट होण्याची संधी दिली”

-मंत्री दुष्काळ दौऱ्यावर असताना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहतात- विजय वडेट्टीवार

शिवसेनेचा प्रत्येक मंत्री, आमदार शेतकऱ्यांसोबत दिसायला हवा- उद्धव ठाकरे

-धक्कादायक! बुधवारपासून पाऊस आठवडाभर विश्रांती घेणार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More