Nashik News | निफाड तालुक्यातील चितेगाव येथील राष्ट्रीय बागवानी अनुसंधान आणि विकास संस्थेच्या (एनएचआरडीएफ) शास्त्रज्ञांनी कांद्याचे नवीन वाण विकसित केले आहे. ‘लाइन-883’ असे नाव या वाणाला देण्यात आले असून, प्रामुख्याने खरीप हंगामामध्ये येणारे हे वाण आहे. (Nashik News)
फक्त 85 दिवसात मिळणार उत्पादन-
शेतकऱ्यांनी लक्षात घेण्यासारखी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या लाल कांद्याचे पीक कमी दिवसांत मिळत असल्याचा दावा शास्त्रज्ञांकडून करण्यात आला आहे. संशोधनानंतर अनेक शेतकऱ्यांना हे बियाणे प्रात्यक्षिक म्हणून दिले होते. त्यानंतर हा महत्त्वाचा दावा करण्यात आला आहे. (Nashik News)
राष्ट्रीय बागवानी अनुसंधान विकास संस्थेतील शास्त्रज्ञ नेहमीच नवनवीन बियाणे विकसित करत असतात. त्याचप्रमाणे खरीप लाल कांद्यावर संशोधन करून हे वाण विकसित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील चितेगाव, लासलगाव, सिन्नर याठिकाणी हे बियाणे उपलब्ध होणार आहे.
नवीन वाणाची महत्त्वाची वैशिष्टये-
उत्पादन क्षमता : हेक्टरी 300 ते 325 क्विंटलपर्यंत उत्पादन देणारे हे वाण आहे.
परिपक्वता कालावधी : 80 ते 85 दिवसांत या कांद्याचे उत्पादन निघणार आहे.
रोग प्रतिकार : करपा आणि मावा रोगाचा प्रादुर्भाव कमी राहणार आहे. (Nashik News)
लाभ : लाल रंगाच्या कांद्याला बाजारात चांगली मागणी असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल.
जूनपासून बियाणे उपलब्ध होणार-
शेतकऱ्यांना जूनपासून हे बियाणे उपलब्ध होणार असून, ऑगस्टमध्ये त्याची लागवड करता येईल, असे केंद्राचे प्लांट पॅथॉलॉजी टेक्निकल अधिकारी डॉ. मनोज पांडे, डॉ. सुजय पांडे, सचिन चौधरी, डॉ. नितीश शर्मा, डॉ. जस्ती श्रीवर्षा यांनी सांगितले आहे. (Nashik News)
News Title : Nashik News New variety of red onion to yield produce in 85 days
महत्वाच्या बातम्या –
सूर्यवंशी कुटुंबाने 10 लाख रुपये नाकारले, राज्य सरकारला मोठी चपराक
वाल्मिक कराडबद्दल आणखी एक धक्कादायक माहिती उघड, लाडकी बहीण योजनेच्या…
शेतकऱ्यांसाठीची महत्त्वाची योजना रखडली; या कारणामुळे योजनेचं भविष्य अधांतरी
आजचे राशिभविष्य! तुमच्या जीवनाचा मार्गदर्शक संदेश, नक्की वाचा
मनसे आणि भाजपची युती होणार? ‘या’ बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य