दोन जिवलग मित्रांनी एकत्र संपवलं जीवन, थरकाप उडवणारी घटना आली समोर

Nashik News | नाशिक शहरात (Nashik News) एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन जिवलग मित्रांनी नाशिक रेल्वे स्थानकाजवळ मालधक्का रोडवर आपलं जीवन संपवलं असल्याची थरकाप उडवणारी घटना घडली आहे. यामुळे नाशिक शहर (Nashik News) पुरतं हादरून गेलं आहे. वालदेवी नदीच्या पुलावर दोघांनी आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. आपलं जीवन संपवणारे युवक हे मालधक्का रोड येथे राहणारे होते.

दोन मित्रांची रेल्वे रूळावर आत्महत्या

मालधक्का रोड एस. के पांडे  शाळेजवळ राहणाऱ्या दोन मित्रांनी रेल्वे रूळावर आत्महत्या केली असल्याची माहिती आता समोर आली आहे. रेल्वेच्या रूळावर मृतदेह छिन्नविछिन्न स्वरूपात पडल्याचं दिसून आलं आहे. दोघांचंही वय हे 17 ते 18 वर्षे असून ते बारावीत शिकत होते. संकेत राठोड सचिन करवर अशी त्यांची नावे होती. लहानपणापासून एकत्र असलेल्या मित्रांचा शेवट झाला. (Nashik News)

संकेत आणि सचिन हे बारावीत शिकत होते. त्यांच्या आत्महत्येने मोठा धक्का बसला आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची नोंद पोलिसांत झाली असून आता रेल्वे पोलीस याबाबत अधिक तपास करताना दिसत आहेत. (Nashik News)

 नाशिक येथे दोन मुलींचा सोबतच अंत

दरम्यान नाशिक येथेच दोन मुलींचा सोबतच अंत झाला असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकच्या त्र्येंबकेश्वर परिसरातील बिल्व तीर्थ येथे पाण्यात बूडुन दोन मुलींचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. कपडे धुण्यासाठी गेल्या असताना मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. अर्चना धनगर आणि तनुजा कोरडे असं दोन मुलींची नावं आहेत.

त्र्येंबकेश्वर पोलीस घटनेचा तपास करत आहे. त्यातून नेमकी कोणती माहिती समोर येईल. हे लवकरच समजेल. दोन जिवलग मित्रांनी केलेली आत्महत्या आणि त्यानंतर दोन मुली पाण्यात बुडून मरण पावल्याची घटना ही नाशिकमध्येच घडलेली आहे.

News Title – Nashik News Two Best Friend Suicide And Ended His Life On Railway Track Near Nashik Road Railway Station

महत्त्वाच्या बातम्या

बुलेट लव्हर्ससाठी खुशखबर; रॉयल एनफिल्डच्या या बाईक लवकरच लाँच होणार

राष्ट्रवादीचा 25 वा वर्धापन दिन; शरद पवार सरप्राईज देणार?

नरेंद्र मोदी यांच्या नव्या सरकारमध्ये कोणकोणत्या नेत्यांनी घेतली शपथ; जाणून घ्या एका क्लिकवर

हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना महत्वाचा इशारा

नरेंद्र मोदी पंतप्रधान होताच झाला दहशतवादी हल्ला; काँग्रेसच्या बड्या नेत्याने साधला निशाणा