नाशकात संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन, सुलभ शौचालयात लावले मुंडे-कराडचे फोटो

Nashik Protest

Nashik Protest | नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने संतोष देशमुख हत्या प्रकरणी अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. शहरातील सुलभ शौचालयामध्ये धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि वाल्मिक कराड (Walmik Karad) यांचे फोटो लावून निषेध नोंदवण्यात आला. या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याची मागणीही आंदोलकांकडून करण्यात आली. (Nashik Protest )

संभाजी ब्रिगेडची जोरदार घोषणाबाजी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. विविध संघटनांकडून आंदोलने केली जात असताना, नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेडने आगळ्या-वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला.

सुलभ शौचालयाच्या भिंतींवर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे फोटो चिकटवून त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या विरोधातही रोष व्यक्त करत कारवाईची मागणी केली.

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सरकारवर रोष व्यक्त करत म्हटले की, धनंजय मुंडे यांना देखील सरपंच संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणात सहआरोपी केले जावे.

धनंजय मुंडेंच्या आमदारकीवरही संकट?

धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचे राजकीय भविष्य काय असेल, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. अनेक राजकीय तज्ज्ञ आणि विरोधक यावर भाष्य करत असून, त्यांची आमदारकी कायम राहणार की रद्द होणार, याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.  (Nashik Protest )

Title : Nashik Protest Sambhaji Brigades Unique Protest Against Dhananjay Munde

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .