मला मार खाणारे नव्हे तर मार देणारे कार्यकर्ते हवेत- राज ठाकरे

नाशिक | पक्षाची ताकद रस्त्यावर असते. त्यामुळे मला मार खाणारे नव्हे तर मार देणारे कार्यकर्ते हवेत, असं वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलंय. ते नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बोलत होते. 

नाशिकमध्ये मनसेची सत्ता आली नाही, हे नाशिकचं दुर्दैव. नाहीतर नाशिक उत्कृष्ट शहर झालं असतं, असं राज ठाकरे म्हणाले. तसेच सोशल मीडियाचा योग्य वापर करा, असं त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं.

दरम्यान, मुंबईतील फेरीवालाविरोधी आंदोलनानंतर मनसेला उभारी देण्याचा राज यांचा प्रयत्न आहेत. त्यामुळे त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केलीय.