मुंबईत घातपाताचा डाव होता? नाशिकजवळ मोठा शस्त्रसाठा जप्त

नाशिक | चांदवड टोलनाक्याजवळ पोलिसांनी एका बोलेरो गाडीतून मोठा शस्त्रसाठा जप्त केलाय. याप्रकरणी पोलिसांनी बोलेरो गाडीच्या चालकाला ताब्यात घेतलंय. 

मालेगावमधील एका पेट्रोल पंपावर इंधन भरल्यानंतर कामगारांना बंदुकीचा धाक दाखवून या बोलेरो चालकाने धूम ठोकली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांना या गाडीला चांदवड नाक्यावर पकडलं. त्यानंतर हा प्रकार समोर आला. 

25 रायफल्स, 19 बंदुका आणि 4 हजार काडतुसं असा हा शस्त्रसाठा आहे. तो मुंबईला नेण्यात येत होता. त्यामुळे काही घातपाताची तर शक्यता नव्हती ना? याचा पोलीस तपास करत आहेत.