मोठी बातमी! पुण्यापाठोपाठ ‘या’ जिल्ह्यातील शाळा देखील 31 मार्चपर्यंत राहणार बंद
नाशिक | राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. नाशिक शहरात कोरोना पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागला आहे. यामुळे पालिकेकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे.
पुण्यापाठोपाठ नाशिकमधीलही सर्व शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. 10 वी आणि 12 वीचे वर्गमात्र पालकांच्या संमतीने ऐच्छिक सुरू राहणार असल्याची माहिती पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे.
होम आयसोलेशन न पाळणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. निर्बंध न पाळणाऱ्या व्यावसायिकांवरही पालिका प्रशासन आणि पोलिसांकडून संयुक्त कारवाई केली जाईल. तसेच होम आयसोलेशन मधील बाहेर फिरणारे सुपर स्प्रेडर त्यांना शोधून जबरदस्ती पालिका रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार, असं जाधव यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, पुण्यातही कोरोना रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहे. पुणे शहरात रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार आहे. तसेच पुण्यातील शाळा 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
थोडक्यात बातम्या-
“पुण्यात 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना लस द्या”
धक्कादायक! एकाच कुटुंबातील 5 जणांनी फाशी घेत संपवलं जीवन
‘आता जगाचा निरोप घेण्याची वेळ आलीये’; सचिन वाझेंच्या व्हाॅट्सअॅप स्टेटसने खळबळ
‘डोकी फुटली तर रडत दिल्लीत जाऊ नका’;संजय राऊतांचा कानडींना इशारा
…अन् लग्नानंतर उलगडलं 25 वर्षीय महिला पुरूष असल्याचं रहस्य; वाचा संपूर्ण प्रकार
Comments are closed.