नाशिकच्या युवकांनी गिरीश महाजनांना पाठवला झंडु बाम आणि मलम!

नाशिक | नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना नाशिकच्या युवकांकडून बाम आणि मलम भेट देण्यात आला आहे. तसेच त्यांना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

अळमनेरमध्ये गिरीश महाजनांसमोर भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हाणामारी झाली होती. यात महाजनांना मारहाण झाली असेल, असं म्हणत युवकांनी चक्क बाम पाठवला आहे.

गिरीश महाजन आमचे नाशिकचे पालकमंत्री आहेत, आम्हाला त्यांची काळजी वाटते. आत्तापर्यंत तर त्यांनी कामे केली नाही. पण आता मलम आणि बाम लावून लवकर बरं होऊन कामाला सुरूवात करावी, असा खोचक टोला या युवकांनी लगावला आहे

दरम्यान, तिकीट कापलं गेल्यामुळे माजी आमदार बी एस पाटील आणि जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या मध्ये वाद झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या

-नेहरु-गांधी घराण्याचा सन्मान करा अन्यथा…; शरद पवारांचा मोदींना सल्ला

-“कुलभूषण जाधवांना सोडवून आणा आणि मग 56 इंचाची छाती दाखवा”

-भाड में गया कानून और भाड में गयी आचारसंहिता; संजय राऊतांची जीभ घसरली

-“विरोधी पक्षनेतेपदासाठी देव पाण्यात घालून बसलेल्यांनी माझी चिंता करू नये”

-मायावतींचा बीएसपी सर्वात श्रीमंत पक्ष; भाजप-काँग्रेसलाही टाकले मागे