नाशिक | विधान परिषदेसाठीचे अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
काँग्रेसचे नेते सुधीर तांबे यांच्या नावाने डमी उमेदवार असलेल्या सुधीर सुरेश तांबे यांनी माघार घेतली आहे. एकाच नावामुळे घोळ होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
डॉ. सुधीर सुरेश तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. एकच सारखे नाव असल्याने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण डॉ सुधीर तांबे यांनी एबी फॉर्म असून देखील अर्ज सादर केला नव्हता.
डमी उमेदवार असलेले सुधीर तांबे हे मूळचे पनवेल येथील आहे. त्याचबरोबर अपक्ष उमेदवार अमोल खाडे यांची देखील माघार घेतली आहे. 22 उमेदवारांपैकी आतापर्यंत 2 जणानी माघार घेतली आहे.
दरम्यान, नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज न भरल्यानं सुधीर तांबेंविरोधात काँग्रेसनं कारवाईचा बडगा उगारला आहे. काँग्रेस पक्षाकडून सुधीर तांबेंचं निलंबन करण्यात आलं आहे. उमेदवारी देऊनही सुधीर तांबेंनी अर्ज दाखल न केल्यामुळे त्यांच्यावर पक्षाने ही कारवाई केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-