राज्यातील ‘या’ विधानसभा मतदारसंघात पुन्हा होणार मतमोजणी

Maharashtra

Maharashtra l राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. मात्र या निकालानंतर अनेक ठिकाणी EVM मशीनमध्ये फेरफार केल्याचा दावा करत फेर मतमोजणीची मागणी केली जात आहे. तसेच अनेक मतदारसंघामध्ये मृत व्यक्तींच्या नावाने देखील मतदान झाल्याचा दावा राज्यातील काही मतदारसंघामध्ये करण्यात आला आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार सुधाकर बडगुजर यांची EVM मशीनची पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली होती. अशातच आता ती मागणी मान्य झाली आहे.

पुन्हा मतमोजणी होणार? :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, विधानसभा निवडणुकीत सुधाकर बडगुजर यांनी निकालावर आक्षेप घेत पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. अशातच आता निवडणूक आयोगाने ही बडगुजर यांची मागणी केली आहे. त्यामुळे आता एकूण मतदान केंद्राच्या 5 टक्के केंद्राची फेर मतमोजणी करण्यात येणार आहे.

याशिवाय प्रति युनिट 40 हजार आणि 18 टक्के जीएसटी भरून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 5 टक्के केंद्राची फेर मतमोजणी करता येणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच सुधाकर बडगुजर यांच्या मागणीनंतर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे बडगुजर यांना सूचना पत्र देखील दिले आहे.

Maharashtra l कोणाला किती मतं मिळाली? :

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार सीमा हिरे विजयी झाल्या आहेत. तर सुधाकर बडगुजर हे दुसऱ्या स्थानावर आहेत. यावेळी भाजप उमेदवार सीमा हिरे यांना 1 लाख 41हजार 725 मते मिळाली आहेत. तर सुधाकर बडगुजर यांना 73 हजार 651 इतकी मते मिळाली आहेत. तर मनसे उमेदवाराला अवघे 46 हजार 649 मते मिळाली आहेत.

News Title : nashik west assembly recounting of votes

महत्त्वाच्या बातम्या- 

एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली, भाजपकडे केली सर्वात मोठी मागणी

सर्वात मोठी बातमी! नाराज एकनाथ शिंदेंना भाजपकडून दोन मोठ्या ऑफर

मुंबईकरांनो ‘या’ भागातील पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणारं!

मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटलांची सर्वात मोठी घोषणा!

आताची सर्वात मोठी बातमी, देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री…

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .