महाराष्ट्र मुंबई

बकरी ईदला कुर्बानीसाठी सूट द्या, नसीम खान यांची उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

मुंबई | मुस्लिम समाजाचा महत्वाचा सण असलेल्या बकरी ईदला कुर्बानी करण्याची सूट देण्यात यावी अशी मागणी काँग्रेस नेते नसीम खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यांनी या संदर्भात एक सविस्तर पत्र लिहिलं आहे.

यंदाच्या वर्षी 1 ऑगस्ट रोजी बकरी ईद आहे. यादिवशी कुर्बानी देण्याची सूट आणि व्यवस्था करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना खान यांनी पत्र लिहिलं. या पत्राची प्रत त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तसंच मंत्री बाळासाहेब थोरात यांना देखील देण्यात आली आहे.

बकरी ईद सणादिवशी कुर्बानी करणे मुस्लिम समाजात अनिवार्य आणि महत्त्वाचं मानलं जातं. या वर्षी कोवीडचा प्रादुर्भाव असल्याने सर्वधर्मीयांनी आपापले सण घरात बसूनच साजरे केले आहेत. अशा परिस्थितीत काही नियम-अटी ठेऊन गणपती उत्सवाला शासनाने परवानगी दिली आहे. याच धर्तीवर मुस्लिम समाजाल देखील अटी-शर्थी ठेऊन ईदला परवानगी देण्यात यावी, असं नसीम खान यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बकरी ईद या मुस्लीम समाजाच्या महत्वाच्या सणाविषयी आत्तापर्यंत शासनाकडून कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे राज्यातील मुस्लीम समाज आणि मुस्लीम संघटनामध्ये अस्वस्थता असल्याचं नसीम खान यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

चिंताजनक! पुण्यात एकाच दिवसात 832 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

आयसीसच्या संपर्कात असलेल्या तरुणीचं बारामती कनेक्शन; पुण्यातून अटक

महत्त्वाच्या बातम्या-

सरकार अस्थिर करण्याचे भाजपचे राष्ट्रीय कार्य पडद्यामागून पण…., सामनातून टीकेचे बाण

“पक्ष संकटात असताना बोटीतून उडी मारणाऱ्या उंदराप्रमाणे पायलट यांनी वागू नये”

“दिल्लीच्या राजकारणात अमित शहा देखील नवे… आम्ही म्हटलं, का नया है वह”

सोलापूर जिल्हा कारागृहात कोरोनाचा झाला होता उद्रेक, साखळी तोडण्यात प्रशासनाला यश!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.