नवी दिल्ली | ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असताना ईव्हीएम हॅक करुन दाखवाच, असं खुलं आव्हान मुख्य निवडणूक आयुक्त डाॅ. नसीम झैदी यांनी राजकीय पक्षांना दिलंय. ३ जूनला प्रत्येक पक्षाला यासाठी ४० मिनिटांचा अवधी देण्यात आलाय.
आपल्याकडे वापरण्यात येत असलेली ईव्हीएम सुरक्षित असून यापुढच्या सर्व निवडणुकांमध्ये तीच वापरली जातील, तसेच त्यासोबत यापुढच्या व्हीव्हीपीएटी मशीन्सनचाही वापर होईल, असं त्यांनी सांगितलं.
Comments are closed.