“…तर मुघलांनी बनवलेला ताज महाल आणि लाल किल्ला पाडून टाका”

मुंबई | ‘ताज’ या आगामी वेब सिरीजमध्ये अभिनेते नसीरुद्दीन शहा (Nasuruddin Shaha) मुघल सम्राट अकबराच्या भूमिकेत दिसणार आहेत. यानिमित्त दिलेल्या मुलाखतीत शहा यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुघल जर एवढे क्रूर आणि विध्वंसक होते तर त्यांनी बनवलेला ताज महाल आणि लाल किल्ला पडून टाका, असं धक्कादायक वक्तव्य शहा यांनी केलं आहे. एका मुलाखतीत नसीरुद्दीन शहा (Nasuruddin Shaha) यांनी हे वक्तव्य केलं आहे.

लोक सम्राट अकबर आणि तैमूर शहामधील फरक सांगत नाहीत याच मला आश्चर्य वाटतं असं नसीरुद्दीन शहा (Nasuruddin Shaha) यावेळी म्हणालेत.

दरम्यान, मुघलांनी त्यांच्या परंपरांना ग्लोरिफाय केलं होत हे सत्यही असेल पण म्हणून त्यांना आपण व्हिलन करू शकत नाही त्यांनी जे काही केलं ते भयानक असेल तर ताजमहाल पाडून टाका, लाल किल्ला आणि कुटूंब मिनार देखील पाडून टाका, असं शहा यावेळी म्हणालेत.

मुघलांचा उदो उदो करण्याची आवश्यकता नाही परंतु त्यांना व्हिलन तर बनवू नका असं देखील नसीरुद्दीन शहा यावेळी म्हणाले

महत्त्वाच्या बातम्या-