बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पठ्ठ्यानं एकाच षटकात खेचले 8 षटकार; ‘या’ खेळाडूची क्रिकेटविश्वात चर्चा

मुंबई | क्रिकेटच्या इतिहासात भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग, हर्षल गिब्ज आणि कायरन पोलार्डने एका षटकामध्ये 6 षटकार ठोकून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रम केला आहे. मात्र या विक्रमाला मागे टाकत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूनी एका षटकमध्ये 50 धावा कुठल्या आहेत. त्यामुळे त्या खेळाडूची चर्चा सध्या क्रिकेटविश्वात केली जात आहे.

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज सॅम हॅरिसन सोरेंटो डनक्रेग सीनिअर क्लबकडून खेळताना नॅथन बॅनेटच्या एका षटकामध्ये तब्बल 50 धावा काढल्या आहेत. क्रिकेटच्या इतिहासामधील सर्वात वाईट षटक नॅथम बॅनेटने टाकला आहे. सॅम हॅरिसनेने 38 व्या षटकमध्ये 8 उत्तुंग षटकार ठोकले आहेत. तर त्यामध्ये त्याने दोन नो बॉल टाकले होते. त्यामुळे त्याने 8 षटकाराचे 48 आणि नो बॉलचे 2 धावा अशा मिळून 50 धावा काढल्या.

हॅरिसननं 39 व्या षटकात 8 षटकार खेचून 80 धावांवर पोहोचला अन् पुढील षटकात त्यानं 22 धावा केल्या. सॅम हॅरिसनने 38 व्या षटकमध्ये 8 षटकार खेटून 80 धावांवर पोहोचला आणि पुढील षटकात त्यांने 22 धावा करत त्याने शतकही साजरे केले. सॅमच्या या खेळीमूळे सोरेंटो संघाने 40 षटकमध्ये 276 धावा काढल्या. मात्र क्रिकेटमध्ये न्युझीलंडचा क्रिकेटपटू बर्ट व्हेंसने देखील प्रथम श्रेणींमध्ये एका षटकमध्ये 77 धावा दिल्या होत्या. त्या षटकमध्ये त्या खेळाडूनी खुप नो बॉल टाकले होते. तर त्या षटकमध्ये 5 षटकार फलंदाजाने खेचले होते.

दरम्यान, 2007 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये युवराज सिंग ने स्टुअर्ट ब्रॉडला एका षटकमध्ये 6 षटकार ठोकले होते. हर्षल गिब्जने नेदरलॅंडविरूद्ध तर कायरन पोलार्डने श्रीलंकेविरूद्ध अशी कामगिरी केली होती.

थोडक्यात बातम्या- 

आई आणि DSP दोन्ही कर्तव्य पार पाडली, लेकराला पोटाला बांधून DSP मुख्यमंत्र्यांच्या ड्यूटीवर

पिंपरीमध्ये वाईन शाॅप मालक आणि ग्राहकात तुफान राडा, पाहा व्हिडीओ

टाटा मोटर्स लवकरच करणार सीएनजी कार लाँच; ‘ही’ असणार किंमत

700 कोटींचा घोटाळा झाल्याचा संजय राऊतांचा दावा; किरीट सोमय्यांना केलं लक्ष घालण्याचं आवाहन

“…लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेलं मुख्यमंत्रिपद”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More