पुणे महाराष्ट्र

‘नथीचा नखरा’ सोशल मीडियात ट्रेंडिंग; नेमका काय आहे हा प्रकार?

पुणे | लॉकडाऊनमुळे घरात बसून वैतागल्यासारखं होत असल्यानं सोशल मीडियात अनेक नवनवीन ट्रेंड पहायला मिळतात. महिलावर्ग यामध्ये आघाडीवर असून आता नथीचा नखरा नावाचा ट्रेंड त्यांनी सुरु केला आहे.

नथीचा फोटो स्टेटसला टाकून आपल्या प्रिय मैत्रिणी तसेच नात्यातील स्त्रियांना चॅलेंज दिलं जात आहे. चॅलेंज मिळालेल्या स्त्रीनं ते स्वीकारुन आपल्या स्टेटसलाही नथ घातलेले स्वतःचे फोटो ठेवायचे असतात.

व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्रामचे स्टेटस आता नथींच्या फोटोंनी भरुन वाहिलेले पहायला मिळत आहेत. महिलावर्गाची या सर्व उपक्रमांना चांगलीच पसंती मिळत आहे. अनेक जणी हिरीरीने स्वतःचे फोटो शेअर करत आहेत.

दरम्यान, याआधी साडीचा ट्रेंड पहायला मिळाला होता. तसेच फिर मुस्कुराएगा इंडिया नावाचा ट्रेंडही आला होता, ज्यामध्ये तुमचा हसायचा फोटो टाकायचा होता, कोरोनाला हरवण्याचा निर्धार या ट्रेंडमध्ये होता.

ट्रेंडिंग बातम्या-

‘या’ मराठी अभिनेत्रीने शेअर केला पतीसोबतचा नको त्या अवस्थेतील फोटो

उद्धव ठाकरेंचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना दणका, उचललं ‘हे’ पाऊल

महत्वाच्या बातम्या-

झेपत नाहीये हे कबूल करण्याचा प्रमाणिकपणा नाही; भाजपचा जयंत पाटलांना टोला

कोरोनाचा महाराष्ट्राला मोठा धक्का; आवडता लोकगीत गायक हिरावला!

महिला पोलिसानं केलेलं ‘हे’ कौतुकास्पद काम पाहून तुम्हीही त्यांना सलाम ठोकाल!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या