बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नागरिकत्व कायदा करुन मोदी सरकारने गांधी-नेहरूंचं वचन पूर्ण केलं”

तिरुअनंतपुरम | नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात संपूर्ण देशात आंदोलन होत आहे. दुसरीकडे भाजपकडून कायद्याच्या समर्थनासाठी रॅलींचे आयोजन केलं जात आहे. अनेक ठिकाणी भाजप, अभाविप आणि इतर संलग्न संघटना रस्त्यावर उतरलेल्या पाहायला मिळाल्या. अशातच केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी देखील या कायद्याला पाठिंबा दिला आहे.

केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा करुन महात्मा गांधी आणि जवाहर लाल नेहरू यांनी पाकिस्तानमध्ये दुःखात जगत असलेल्या लोकांना दिलेल्या वचनाची पूर्तता केली, असं मत आरिफ खान यांनी व्यक्त केलं आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी पाकिस्तानमधील लोकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्ती नागरिकत्व सुधारणा कायद्याने झाली आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना आनंदी व्हायला हवं, असं आरिफ मोहम्मद खान  यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,पंडित नेहरू म्हणाले होते की नवी सीमा तयार केल्याने आमचे लोक परके होणार नाहीत. या लोकांनी देखील आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्याची लढाई लढली आहे.  ते आत्ता येवो अथवा पुढे कधीही येवो आम्ही त्यांचं स्वागत करु. 1971 मध्ये याला कायदेशीर रुप देण्यात आलं आणि अनेक लोकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलं, असंही आरिफ खान यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More