चंदिगड | आम्हाला सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी द्या, असं काही शेतकऱ्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहलं आहे.
शहाबाद ते जयपूर या शहरांना जोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग बनवण्यात येत आहे. त्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहण केल्या जात आहेत. सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी पत्रात केला आहे.
सरकारकडून जमीन अधिग्रहण करताना बाजारभावानुसार किंमतीची घोषणा केली नाही. गेल्या 5 महिन्यापासून शेतकरी रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत, अशी माहिती शेतकरी नेते दलाल यांनी सांगितली.
सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडे केली आहे.
महत्वाच्या बातम्या
-मनसेच्या ‘या’ डॅशिंग नेत्याला पुजारी टोळीकडून जिवे मारण्याची धमकी!
-केतकी चितळेला अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांना अटक करा; मुख्यमंत्र्यांची सूचना
-‘बिग बॉस’मधून ‘या’ सदस्याला हाकला; माजी नगरसेविकेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
-“शिवेंद्रराजे, मिशीवाल्यासोबत खाल्लेल्या मिसळीचा ठसका लागतोय का?”
-मुख्यमंत्रिपदाची जागा पुढची 5 वर्ष रिकामी नाही; भाजपचा शिवसेनेला टोमणा
Comments are closed.