Top News नागपूर महाराष्ट्र

महाराष्ट्राची आणखी एक संस्था गुजरातला हलवली, दुर्दैव म्हणजे राजकारण्यांनी ब्र देखील काढला नाही!

नागपूर |  राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्था आणि तिची प्रयोगशाळा गुजरातला हलविण्यात आली आहे. महारष्ट्रात सर्वांत जास्त कोरोना केसेस असताना तसंच शासन-प्रशासन कोरोनाशी लढताना व्यस्त असताना ही केंद्रिय संस्था गुजरातमधल्या अहमदाबादेत हलविण्यात आली आहे. (National Institute Of Mining Health Went To Ahmedabad)

नागपुराताल असलेली राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्था आणि तिची प्रयोगशाळा अहमदाबाद मधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थमध्ये विलीन करण्यात आली आहे. (National Institute Of Mining Health Went To Ahmedabad) यासंबंधीचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे.

नागपुरात असणाऱ्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून खाणीत काम करणारे कामगार आणि खाणीलगत राहणारे नागरिक यांच्या आरोग्याच्या प्रश्नावर गेली बरीच वर्षे ही प्रयोगशाळा काम करत होती. (National Institute Of Mining Health Went To Ahmedabad) त्यामुळे खाणी मध्ये काम करणारे आणि खाणीशेजारी राहणाऱ्या लाखो लोकांच्या आरोग्यासंदर्भात संशोधन होऊन त्यावर उपाय शोधले जात होते.

2019 मध्ये मोदी सरकारने राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्थेला तिच्या प्रयोगशाळेसह अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्यूपेशनल हेल्थ या संस्थेत विलीन करण्याचे ठरविले होते. त्यांसदर्भात जुलै 2019 मध्येच केंद्रीय कॅबिनेट बैठीकीमध्ये प्रस्ताव देखील पारित करण्यात आला. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. आता देश कोरोनाशी झुंजत असताना राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्था आणि तिची प्रयोगशाळा ही गुजरातला हलविण्यात आल्याने विदर्भातून तसंच महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येतोय. (National Institute Of Mining Health Went To Ahmedabad)

दुसरीकडे एवढी महत्त्वाची संस्था महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात येत होती मात्र महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांनी म्हणावा असा आवाज उठवला नाही. काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्था महाराष्ट्रातून बाहेर नेणे हा महाराष्ट्रावर अन्याय आहे असं म्हणत यासाठी मी लढणार असल्याचं ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितलं आहे. (National Institute Of Mining Health Went To Ahmedabad)

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोना अलर्ट… जागतिक स्तरावर कोरोनाचा मृत्यूदर तब्बल ‘इतक्या’ पटीनं वाढला!

पुणेकरांना दिलासा! एकाच दिवशी मिळाल्या ‘या’ दोन बड्या गुडन्यूज

सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे- अनिल देशमुख

अजितदादांना मुख्यमंत्री बनलेलं बघायचंय, राखीपोर्णिमेनिमित्त बहिणीची इच्छा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या