बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बिपीन रावत यांचं निधन, राष्ट्रपतींचा दौरा रद्द तर पंतप्रधान मोदींनी बोलवली महत्त्वाची बैठक

नवी दिल्ली | देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत (CDS Bipin Rawat) यांच्या हेलिकाॅप्टरला अपघात झाला होता. बैठकीसाठी आपल्या स्टाफ (Defence Staff) आणि पत्नीसह (Wife Of Bipin Rawat) जात असताना तामिळनाडूच्या कोईम्बतूर (Koimbtur) येथे अपघात झाला. यामध्ये दुर्घटनेत त्यांचं निधन झालं आहे. परिणामी सध्या देशात मोठ्या हालचाली चालू झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तत्काळ सुरक्षा समितीची बैठक बोलावली आहे.

बिपीन रावत यांच्यासह 14 जणांचा अपघात झाला आहे. सदर घटनेनं भारतीय सैन्यदलाची हालचाल वाढवली आहे. तिन्ही सैन्यदलाचे सरसेनापती म्हणजेच भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपला महाराष्ट्र दौरा तत्काळ रद्द करत दिल्लीकडं प्रस्थान केल्याची माहिती देखील आता समोर आली आहे.

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि लष्करप्रमुख मनोज नरवणे हे बिपीन रावत यांच्या दिल्ली येथील घरी जाऊन त्यांच्या परिवाराची भेट घेऊन आले आहेत. बिपीन रावत हे देशातील सर्वात ताकदवान लष्करी अधिकारी होते. आपल्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी अप्रतिम कामगिरी केली होती. अशातच त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे आता सुरक्षा यंत्रणा देखील कामाला लागल्या आहेत.

दरम्यान, बिपीन रावत हे देशाचे माजी लष्करप्रमख होते. देशाचे पहिले सीडीएस म्हणून कार्य देखील केलं आहे. देशाच्या तिन्ही संरक्षण दलांमध्ये समन्वय राखण्यासाठी भारत सरकारकडून सीडीएस या पदाची निर्मिती करण्यात आली आहे. अशातच आता सीडीएस पदाची जबाबदारी कोणाकडे जाणार याकडे आता सर्वाचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या 

“मी पाहिलं की आग लागलेल्या अवस्थेत…”; प्रत्यक्षदर्शीनं सांगितली बिपीन रावत यांच्या अपघाताची माहिती

अपघाताच्या 24 तासांपूर्वी बिपीन रावत यांनी दिला होता ‘हा’ गंभीर इशारा

“2024 मध्ये भाजपचे 418 खासदार येणार, सगळे मोदींनाच मतदान करणार”

Vasant More | अन् राजसाहेब मला म्हणाले,”तू काही स्ट्रेसमध्ये आहेस का?”

सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या IAF MI 17 हेलिकॉप्टरचा अपघात; वाचा सविस्तर माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More