बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी पाहिलं की आग लागलेल्या अवस्थेत…”; प्रत्यक्षदर्शीनं सांगितली बिपीन रावत यांच्या अपघाताची माहिती

नवी दिल्ली | देशाच्या सीमेचं आणि सार्वभौमत्वाचं संरक्षण करणाऱ्या संरक्षण दलाचे सीडीएस बिपीन रावत (CDS Bipin Rawat) यांचा अपघात (Accident) झाला आहे. जनरल बिपीन रावत यांच्यासोबत लष्कराचे जवान (Indian Army Officers) आणि त्यांच्या पत्नी (Wife Of Bipin Rawat) सुद्धा हेलिकाॅप्टरमध्ये (Helicopter) उपस्थित होत्या. या अपघातानं सर्व देशाला हादरवून टाकलं आहे. आता प्रत्यक्षदर्शींनी घडलेल्या अपघाताची माहिती सांगितली आहे.

सीडीएस बिपीन रावत यांना घेऊन जाणाऱ्या भारतीय लष्कराच्या अत्याधुनिक हेलिकाॅप्टरनं अचानक कोसळल्याची प्राथमिक माहिती सध्या प्राप्त झाली आहे. कृष्णास्वामी या प्रत्यक्षदर्शीनं जे पाहीलं ते सागितलं आहे. एक मोठं हेलिकाॅप्टर उंचच उंच झाडांना टक्कर देत खाली कोसळलं. माझ्या घरापासून अगदी 100 मीटर अंतरावर ते कोसळल्याचं कृष्णस्वामी यांनी सांगितलं आहे.

हेलिकाॅप्टर पुर्ण आगीमध्ये होते. 2-3 जण हेलिकाॅप्टरमधून आग लागलेल्या अवस्थेत बाहेर पडले होते. हे पाहाणं माझ्यासाठी खुपच चित्तथरारक होतं असं कृष्णास्वामी म्हणले आहेत. भेदरलेल्या अवस्थेत मी माझ्या साथीदारांना हाका मारत होतो. ते लागलीच आले आम्ही पोलिसांना आणि अग्निशमन यंत्रणेला पहिल्यांदा संपर्क केला, असं प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं आहे.

दरम्यान, बिपीन रावत हे देशाचे पहिले सीडीेएस आहेत. भारतीय लष्कराचे माजी लष्करप्रमुख पदावर काम केलेले एक अनुभवी अधिकारी म्हणून बिपीन रावत यांची ओळख आहे. बिपीन रावत यांच्या तब्येतीसाठी देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहेत.

थोडक्यात बातम्या 

अन् राजसाहेब मला म्हणाले,”तू काही स्ट्रेसमध्ये आहेस का?”; वसंत मोरेंची भावनिक पोस्ट

सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या IAF MI 17 हेलिकॉप्टरचा अपघात; वाचा सविस्तर माहिती

भाजपचं टेन्शन वाढलं! उत्तर प्रदेश निवडणुकीआधी प्रियंका गांधींचा मोठा निर्णय

भाजप उदयनराजेंवर नाराज? साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

“एकीकडे RSS समान नागरी कायद्यासाठी आग्रही, तर भाजप…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More