बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आता ‘या’ दिवशी साजरा होणार ‘राष्ट्रीय भालाफेक दिन’

नवी दिल्ली | टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवलेल्या घवघवीत यशामुळे सध्या देशभरात आनंदाचं वातावरण आहे. ऑलिम्पिकमध्ये अखेरच्या दिवशी भालाफेकमध्ये नीरज चोप्रा याने सुवर्ण पदक मिळवल्यानं भारताची मान उंचावली आहे. अथलेटिक्समध्ये भारताचं हे पहिलंच सुवर्णपदक आहे.

7 ऑगस्ट रोजी निरजने हे पदक जिंकलं आहे. यामुळे नीरज चोप्राच्या सन्मानार्थ 7 ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय भालाफेक दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. अथलेटिक्स महासंघाचे ललित भानोत यांनी हा निर्णय घोषित केला आहे.

ललित भानोत म्हणाले की, 7 ऑगस्ट हा दिवस देशभरात ‘राष्ट्रीय भालाफेक दिन’ म्हणून साजरा करण्यात येईल. या दिवशी देशभरात भालाफेकीच्या स्पर्धा घेण्यात येतील. संघटनेशी 600 हून अधिक जिल्हा संघटना संलग्न आहेत. या ठिकणी देखील 7 ऑगस्ट रोजी भालाफेक स्पर्धा होतील.

तसेच टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजने केलेला पराक्रम आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आहे. देशातील नवोदितांसाठी नीरजने मिळवलेलं हे पदक स्फूर्तीदायी ठरेल, असं देखील भानोत यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

कुस्तीपटू विनेश फोगट निलंबित! ऑलिम्पिकमध्ये नियमांचं उल्लंघन केल्यानं WFI ची धडक कारवाई

मुंबईकरांची पाससाठी रेल्वे स्थानकावर गर्दी, वाचा पाससाठी कोणती कागदपत्रं गरजेची?

राज्य सरकारचा मोठा निर्णय; राजीव गांधी यांच्या नावाने दिला जाणार पुरस्कार

शाळा उघडताच कोरोनाचा शिरकाव; 20 विद्यार्थीं कोरोना पाॅझिटिव्ह सापडल्यानं खळबळ

“लसीचे दोन्ही डोस घेतलेले मुख्यमंत्री मंत्रालयात जाणार की अजूनही घरुनच काम करणार?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More