‘…म्हणून सैफच्या पाठित वार केला’; चौकशीतून खळबळजनक माहिती समोर

Saif Ali Khan

Saif Ali Khan l अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) झालेल्या हल्ल्याप्रकरणी (Attack Case) तपासात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. आरोपी शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर (Shariful Islam Shehzad Mohammad Rohilla Amin Fakir) हा एक बांगलादेशी घुसखोर (Bangladeshi Infiltrator) असून, तो सुमारे सात महिन्यांपूर्वी मेघालयातील (Meghalaya) डावकी नदी (Dawki River) ओलांडून भारतात (India) आला होता. त्याने पश्चिम बंगालच्या (West Bengal) रहिवाशाचे आधार कार्ड (Aadhaar Card) वापरून सिमकार्ड (SIM Card) खरेदी केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

पोलिसांच्या (Police) चौकशीत आरोपीने सैफवरील (Saif) हल्ल्याचे कारणही सांगितले. सैफ अली खानला (Saif Ali Khan) या हल्ल्यात पाठीला गंभीर दुखापत झाली होती. आठवडाभराच्या उपचारानंतर त्याला रुग्णालयातून (Hospital) घरी सोडण्यात आले.

चोरीच्या उद्देशाने घरात घुसखोरी; सैफशी झटापट :

१6 जानेवारीच्या मध्यरात्री आरोपीने अभिनेता सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) वांद्रे (Bandra) येथील सतगुरु शरण (Satguru Sharan) इमारतीमधील फ्लॅटमध्ये (Flat) बाथरूमच्या (Bathroom) खिडकीतून (Window) चोरीच्या (Theft) उद्देशाने प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यानंतर अभिनेत्याच्या कर्मचाऱ्यांनी त्याला पाहिले आणि त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

काही वेळातच सैफ अली खान तिथे आला आणि त्याने आरोपीला समोरून घट्ट पकडले. आरोपी हा राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू (National Level Wrestler) असल्याने, त्याने स्वतःला सोडवण्यासाठी सैफच्या पाठीवर चाकूने (Knife) सहा वेळा वार केले. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला.

आरोपीची कबुली; दोन तास बागेत लपला :

“आरोपीला हालचाल करण्यास वाव न मिळाल्याने त्याने स्वत:ला त्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी अभिनेत्याच्या पाठीवर चाकूने वार केले. या हल्ल्यात खान जखमी झाला आणि आरोपी त्याच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाला,” अशी माहिती पोलिसांनी (Police) दिली. पुढे त्यांनी सांगितले की, हल्ल्यानंतर घुसखोर खान यांच्या फ्लॅटमधून पळून गेला आणि एका इमारतीच्या बागेत (Garden) सुमारे दोन तास लपून राहिला.

Saif Ali Khan l आरोपीला अटक (Arrest); पोलीस कोठडी (Police Custody) :

या हल्ल्यात सैफला (Saif) गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर शस्त्रक्रिया (Surgery) करावी लागली. शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर हा ३० वर्षीय बांगलादेशी (Bangladeshi) नागरिक आहे. त्याला पोलिसांनी (Police) रविवारी (Sunday) अनेक ठिकाणी शोध घेतल्यानंतर अटक (Arrest) केली. न्यायालयाने (Court) त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.

News Title : National Level Wrestler and Bangladeshi Infiltrator Attacked Saif Ali Khan, Reveals Police Investigation

 

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .