देश

पश्चिम बंगालमधील शहांच्या रॅलीत हिंसाचार; योगींची रॅली रद्द

कोलकाता | पश्चिम बंगालमधील भाजपाध्यक्ष अमित शहांच्या रोड शोमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची रॅली रद्द करण्यात आली आहे.

बुधवारी कोलकात्याच्या फुल बागान भागामध्ये योगी आदित्यनाथ यांची रॅली होणार होती. पण ऐनवेळी ती रद्द करण्यात आली. पश्चिम बंगालच्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने ही रॅली रद्द केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

भाजपची भीती वाटते म्हणून सभेसाठी उभारलेली मंडप मोडण्यात आली. मजूरांना मारहाण करुन, रॅली रद्द करुन पश्चिम बंगालला काय बनवायचं आहे?, असा सवाल आदित्यनाथ यांनी उपस्थित केला आहे.

पश्चिम बंगालमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या तीन रॅली होणार होत्या. एक रद्द झाली असून ते आता हावडा आणि केएफआरमध्ये सभा घेणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

-गुजरातमधील मुख्यमंत्री म्हणून मोदींचा कार्यकाळ हा संपूर्ण देशासाठी कलंक- मायावती

-“अमित शहांनी पश्चिम बंगालमध्ये भाडोत्री गुंड आणले”

-मुस्लिम समाजातून अब्दुल कलाम यांच्यासारखे नेते आम्ही बाहेर आणले- नरेंद्र मोदी

-मनसेचा ठाण्यात शेतकरी मोर्चा; सरकारविरोधात पुकारणार एल्गार

-…म्हणून मोदी हटाओ हाच त्यांचा अजेंडा आहे- नरेंद्र मोदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या