शेतकऱ्यांना कर्ज देण्यात बँकांचा हात आखडता, १० टक्केच कर्जवाटप!

मुंबई | राज्य सरकारच्या आदेशानंतरही राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आखडता हात घेतला आहे. राष्ट्रीयकृत बँकांकडून आतापर्यंत फक्त १० टक्केच कर्जवाटप करण्यात आलं आहे. 

यंदा ५८ हजार ६६२ कोटी रुपयांचा कर्ज वितरणाचा आराखडा तयार करण्यात आलाय. सर्व शेतकऱ्यांना तातडीने १० हजार रुपये देण्याची घोषणा ११ जूनला राज्य सरकारने केली. मात्र राष्ट्रीयकृत बँकांनी १५ जुलैपर्यंत यासंदर्भात आदेशच न दिल्याचं समोर आलंय.

दरम्यान, राष्ट्रीयकृत बँकांच्या नाकर्तेपणावर कडक भूमिका घेण्याची मागणी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केलीय. 

थोडक्यात बातम्या मिळवण्यासाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या