बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील नटूकाका यांचं निधन

मुंबई | गेल्या 13 वर्षापासूून आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील नट्टू काकाची भूमिका साकारणारे अभिनेते घनश्याम नायक यांनी 78 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

घनश्याम नायक हे गेल्या वर्षीभरापासून कर्करोगाशी झुंज देत होते. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे निर्माते आसित कुमार मोदी यांनी नट्टू काकाच्या निधनाची माहिती दिली. ‘ओम शान्ति’ आणि नट्टू काकाचा फोटो शेअर करत आसित कुमार मोदी याबाबत ट्विट केलं आहे.

गेल्या वर्षापासून कोरोनामुळे परिस्थितीही बदलली आहे आणि कोरोना इथेच राहणार आहे. याचा अर्थ असा नाही की मी घाबरेल आणि घरात बसेन. मी सकारात्मक विचार करणारा आहे आणि मी निराक्ष होऊ शकतं नाही किंवा नकारात्मक विचार करत नाही. मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचे आहे. आणि चेहऱ्यावर मेकअप असताना अखेरचा श्वास घ्यायचा आहे. माझी ही इच्छा देवाने पूर्ण केली पाहिजे, असं नट्टू काकांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटलं होतं.

दरम्यान, घनश्याम नायक यांनी बॉलिवुड आणि जवळपास 350 पेक्षा अधिक टिव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. हम दिल के चुके सनम, तेरे नाम यासारख्या चित्रपटात काम केलं आहे. चोरी चोरी, खाकी आणि नसीरुद्दीन शाह यांच्या मासूम या चित्रपटात देखील घनश्याम नायक यांनी काम केलं आहे. परंतु ‘तारक मेहता का उल्टा चेष्मा’ या मालिकेतील नट्टू काकाचं पात्र प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहणार आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-

‘आर्यनला श्वास घेण्याची संधी द्या कारण…’; ड्रग्ज प्रकरणाबाबत सुनिल शेट्टीचं मोठं वक्तव्य!

किंग खानचा मुलगा आर्यनच्या अटकेनंतर #SRK_का_बेटा_नशेडी हॅशटॅग होतोय ट्रेंड!

ह्रदयद्रावक! केंद्रीय मंत्र्यांच्या मुलांनी आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्यामुळे दोघांचा मृत्यू

राष्ट्रवादीने अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाची संधी द्यायला हवी- चित्रा वाघ

‘शरद पवारांना पंतप्रधान व्हायचं असेल तर त्यांनी…’; सुधीर मुनगंटीवारांचा पवारांना सल्ला

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More