महाराष्ट्र मुंबई

नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार स्वर्गीय रत्नाकर मतकरी यांना जाहीर

मुंबई | राज्य शासनामार्फत देण्यात येणारा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक स्वर्गीय रत्नाकर मतकरी यांना जाहीर झाला आहे.

2019-20 या वर्षासाठीचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार स्वर्गीय रत्नाकर मतकरी यांना मरणोत्तर घोषित करण्यात आला आहे. 5 लाख रूपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

राज्यात लॉकडाउन लागू झाल्याने पुरस्काराची घोषणा आणि प्रदान समारंभ होण्यापूर्वीच रत्नाकर मतकरी यांचं आकस्मिक निधन झालं. रत्नाकर मतकरी यांनी नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कांदबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य अशा सर्व साहित्य प्रकारांत दर्जेदार लेखन केलं.

दरम्यान, मतकरी यांच्या कार्याचा गौरव अनेक पुरस्कार आणि सन्मान देऊन करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

मनसेचं शिष्टमंडळ ऊर्जामंत्र्यांच्या भेटीला; नितीन राऊतांकडे केली ‘ही’ मागणी

लॉकडाऊनमुळे पुण्यातील इस्टेट एजंट बनला सोनसाखळी चोर

महत्वाच्या बातम्या-

आयपीएलचा तेरावा हंगाम भारताबाहेर होणार!

बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या वादात अभिनेत्री तापसी पन्नूची उडी, म्हणाली…

‘या’ देशाने पबजी गेमवर घातली बंदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या