बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतात नोकऱ्या मिळण्याचं प्रमाण 61 टक्क्यांनी घटलं; ‘या’ शहराला सर्वाधिक फटका

भारतात कोरोना बाधीत रूग्णांचा आकडा वाढू लागला. व्हायरसच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी सरकारनं लाॅकडाऊन लागू केला. ३ महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर लाॅकडाऊन आता शिथील केला जातोय. जनजीवन अगदी सुरळीत होण्याच्या मार्गावर असतानाच, देशात नोकरी मिळवण्याच्या प्रमाणात कमालीची घट झाली आहे. नागरिकांसाठी ही नक्कीच चिंतेची बाब म्हणावी लागेल.

Photo: The Week

www.naukari.com या जाॅब आधारित वेबसाईटचा यासंबंधी एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. अहवालानुसार, लाॅकडाऊन काळात नोकरी मिळवण्याच्या प्रमाणात कमालीची घट झाल्याचं समोरं आलं. मे महिन्यात तब्बल ६१ टक्के तर मार्च महिन्यात ६२ टक्के इतकी नोकरीतील घट आढळून आली. या कारणांमुळे भारताला भविष्यात गंभीर बेरोजगारीला सामोरं जावं लागण्याची दाट शक्यता आहे.

या लाॅकडाऊनचा सर्वाधिक फटका देशातील बड्या शहरांना बसला. मजुरांनी केलेलं स्थलांतर, बाजारपेठेतील मंदी, कंपन्यांची आर्थिक चणचण या गोष्टींचा परिणाम म्हणून ही घट समोरं आल्याचं बोललं जात आहे. अहवालाच्या आकडेवारीनुसार कोलकाता शहरात ही घट सर्वाधिक असल्याचं आढळून आलं. शहरात नोकरीची तब्बल ६८ टक्के इतकी घट झाली आहे. जनजीवन सुरळीत झालं तरी हा नवा रोजगाराचा प्रश्न मार्गी लावताना पश्चिम बंगाल सरकारचा चांगलाच कस लागणार आहे.

राजधानी दिल्लीतही ६७ टक्क्यांची घट आढळून आली. तर देशाची आर्थिक नाडी म्हणून ओळख असलेल्या मुंबई शहरालाही बेरोजगारीचा विळखा पडलाय. मुंबई शहरात आलं म्हणजे एखादं काम हाती पडणारच, हे अगदी आत्मविश्वासानं कुठलाही मुंबईकर बोलू शकतो. आता मात्र या शहरातीलही नोकरीची घट ६७ टक्के इतकी नोंदविली गेली आहे. कोरोनाचं नवं हाॅटस्पाॅट असलेलं हे शहर भितीच्या सावटाखाली असताना, आता नागरिकांच्या हाताशी नोकरीही पडणार नसल्याचं शक्यता वर्तविली जात आहे.

कामातील अनुभव या कठीण काळात महत्वाचा ठरणार असल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. ० ते ३ वर्ष दरम्यानचा अनुभव असलेल्या नागरिकांना याचा बराच तोटा सहन करावा लागेल. मात्र नव्यानेच नोकरीच्या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरूण पिढीला जाॅब्स मिळवणं फारच अवघड असल्याचं समोरं आलं आहे.

अहवालानुसार, हाॅटेल व विमान वाहतूक व्यवसायात नोकरीची सर्वाधिक घट नोंदविली गेली आहे. घाऊक बाजारालाही या घटीचा तोटा सहन करावा लागलाय. भारत हा तरुणांचा देश समजला जातो. मात्र परिस्थिती जैसे थे झाल्यावर अनेक तरुणांच्या हाताशी रोजगार नसल्याचं भीषण चित्रण दिसू शकतं. एकिकडे लाॅकडाऊन काळातील तोटा सावरताना सरकारला हा बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लावताना बरीच तारेवरची कसरत करावी लागणार यात तीळमात्र शंका नाही.

नोकरीतील घटीचं प्रमाण

हाॅटेल/विमान वाहतूक – ९१%

रिटेल – ८७%

ऑटो व पूरक उद्योग – ७६ %

फायनान्स/अकाऊंटींग – ७९%

आयटी व हार्डवेअर – ५८%

विमा क्षेत्र – ५५%

आरोग्य सेवा/हाॅस्पिटल – २०%

ट्रेंडिंग बातम्या-

पुढचे दोन आठवडे धोक्याचे; जागतिक आरोग्य संघटनेनं दिला ‘हा’ महत्त्वाचा इशारा

“एकुलत्या एक पुत्राने देशासाठी प्राणार्पण केल्याचा आम्हाला अभिमान”

महत्वाच्या बातम्या-

“सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येबाबत मी लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार”

ठाकरे सरकार जातीय आणि धर्मवादी, वाढत्या जातीय हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांची टीका

पोलीस हवालदाराची लेक झाली कलेक्टर; वाचा सातारच्या स्नेहलची थक्क करणारी संघर्षगाथा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More