बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘समीर वानखेडे 2 लोकांचे फोन टॅप करत आहे’, नवाब मलिकांच्या आरोपाने खळबळ

नवी दिल्ली | नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर बनावट डॉक्युमेंट्सच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोप केला होता. यासोबतच नवाब मलिकांनी समीर वानखेडे यांच्यावर इतरही अनेक गंभीर आरोप लावले आहेत. आता पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी त्यांच्या मुलीचा सीडीआर मागण्यावरून समीर वानखेडेंना जाब विचारला आहे.

मलिक म्हणाले, समीर वानखेडेंनी मुंबई पोलिसांकडून माझ्या मुलीचा सीडीआर मागवला. सीडीआर गुन्हेगारांचा मागितला जातो. सीडीआर मागवायला माझी मुलगी निलोफर मलिक गुन्हेगार आहे का? कोणत्या आधारावर माझ्या मुलीची खासगी माहिती मागवली जातेय? असा सवाल नवाब मलिकांनी वानखेडेंना विचारला आहे.

मलिक यांनी वानखेडेंना “हिंमत असेल तर माझ्या मुलीचा सीडीआर मागाच. त्यातही आम्ही कायदेशीर लढाई लढू” असा इशारा दिला आहे. यानंतर त्यांनी “समीर वानखेडे 2 लोकांचे फोन टॅप करत असून लोकांच्या फोनला इंटरसेप्ट करत असल्याचा आरोप केला आहे. शिवाय “आज नाही तर उद्या हेही आम्ही जगासमोर आणणार आहोतच”, असंही मलिक यांनी सांगितलं आहे.

मलिक यांनी हे सर्व आरोप केल्यानंतर समीर वानखेडेंबाबतची अनेक सत्य आम्ही जगासमोर आणू असा इशारा दिला आहे. त्यासोबतच ही लढाई दिर्घ चालेल असंही मलिक म्हणाले आहेत. दिवसेंदिवस समीर वानखेडे आणि मलिक यांच्यातील  वाद वाढतानाच दिसत आहे. त्यामुुळे हे प्रकरण आता नेमकं काय वळण घेणार? हे पाहणं  महत्त्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या-

पेट्रोल महागलं म्हणून ‘या’ पठ्ठ्यानं चक्क खरेदी केला घोडा

मराठी सिनेमाचा सोनेरी काळ पाहिलेल्या ‘किबे लक्ष्मी थिएटर’चा पडदा कायमचा बंद होणार?

गावावरुन आलं, बुधवार पेठेत गेलं अन् भलतंच घडलं…

मराठी सिनेसृष्टीतील अजरामर अभिनेता लक्ष्याचा आज जन्मदिवस, पाहा त्याचे आठवणीतील फोटोज्

‘एनसीबीच्या अज्ञात अधिकाऱ्याकडून पत्र’, नवाब मलिकांच्या ट्विटनं पुन्हा खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More