चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ अजब वक्तव्याचा नवाब मलिकांकडून समाचार, म्हणाले…

पुणे | भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने तरुणाईला जोडण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या युवा वॉरियर्स अभियानाचा शुभारंभ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्यात झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं, असं अजब वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. यावरून अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे.

अब्दुल कलाम जेव्हा राष्ट्रपती झाले; तेव्हा अटलजी सत्तेत होते. कलाम यांना राष्ट्रपती करण्याचा निर्णय एकमताने झाला होता. त्यामध्ये नरेंद्र मोदींचा सहभाग नव्हता, उलट त्या काळात अटलजी मोदींना राजधर्म काय?, याचा धडा शिकवत होते, अशा शब्दात म्हणत नवाब मलिकांनी चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र सोडलं आहे.

यावेळी बोलताना मलिकांनी कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवरही भाष्य केले. आम्ही उद्यापासून जनता दरबारही रद्द करत आहोत. मात्र, भाजपकडून राजकीय कार्यक्रम मोठ्या संख्येनं घेतले जात आहेत. लॉकडाउनमध्ये विरोधकांनी हे उघडा ते उघडा, अशी मागणी केली. आता ते उलटा आरोप करत आहेत, असं म्हणत मलिकांनी भाजपच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, देशभक्त मुस्लिम आणि देशद्रोही मुस्लिम यांच्यातला फरक समजावून सांगताना काश्मिरमध्ये बॉम्बस्फोट करणारा मुस्लिम देशद्रोही तर देशसाठी झटणारा मुस्लिम देशभक्त मुस्लिम असं म्हणत, आपला सगळ्या मुस्लिमांना विरोध नाही. तर देशद्रोही मुस्लिमांना विरोध असल्याची भूमिका चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केली होती.

थोडक्यात बातम्या-

धकधक गर्ल माधुरी दीक्षितचं नवं फोटोशूट; चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा पाऊस

राजकीय नेते कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत, खरं तर ही आमची मोठी चूक- विश्वजीत कदम

जिल्हाधिकारी असावा तर असा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला ‘हा’ स्तुत्य निर्णय!

“नरेंद्र मोदींनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं”

“सकाळी आयसोलेशन, रात्री सेलिब्रेशन…हाच आहे काँग्रेसचा तमाशा”

 

Abdul KalamBjpChandrakant PatilNarendra ModiNavab Malikअब्दुल कलामचंद्रकांत पाटीलनरेंद्र मोदीनवाब मलिकभाजप